क्रिकेटपटूंच्या संपामागे बांगलादेश मंडळाला कटाचा संशय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-23 04:39:00

img

वृत्तसंस्था/ ढाक्का

बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी आपल्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी केली असून या मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत संपाचा इशारा दिला आहे. दरम्यान क्रिकेटपटूंच्या संपामागे कटाचा संशय बांगलादेश क्रिकेट मंडळाने व्यक्त केला आहे. या स्थितीमुळे बांगलादेशच्या भारत दौऱयावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

बांगलादेश क्रिकेटपटूंच्या या बहिष्कारामुळे देशातील क्रिकेट क्षेत्रावर अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशचा संघ 3 नोव्हेंबरपासून भारताच्या दौऱयावर येत आहे. तथापि बांगलादेश क्रिकेटपटूंची मानधन वाढीची मागणी मंडळाकडून पूर्ण केली जात नाही तोपर्यंत या दौऱयावर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकीब अल हसन, मेहमुदुल्ला आणि मुष्फिकर रहीम यांनी बहिष्काराची घोषणा केली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या संचालकांची तातडीची बैठक बोलाविली होती. बांगलादेश क्रिकेटपटूंच्या बहिष्काराच्या निर्णयामागे कट कारस्थान  शिजत असल्याचा संशय मंडळाचे अध्यक्ष नजिमुल हसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बांगलादेश क्रिकेटपटूंनी आपल्या मागण्यासाठी प्रसार माध्यमाशी संपर्क न साधताना मंडळाशी चर्चा करावी, असेही सांगितले. या प्रकरणावर तातडीने सामोपचाराने तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD