क्रिकेट नव्हे, पैशांचा बाजार – पोलॉक

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-06 09:15:00

img

विशाखापट्टणम: एकेकाळी सज्जनांचा खेळ अशी असलेली ओळख क्रिकेटने गमावली असून या खेळाचा आता धंदा नव्हे तर बाजार झाला आहे, अशी परखड टीका दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉकने केली आहे.

देशासाठी खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहात असतो, मात्र सध्याचे चित्र वेगळे आहे. आता देशासाठी नव्हे तर पैशांकडे पाहून खेळाडू खेळतात. कोणत्याही स्पर्धेसाठी संघनिवड करताना खेळाडू इतर

स्पर्धेत सहभागी होऊन जास्त पैसे मिळविण्यासाठी राष्ट्रीय संघाच्या निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे कळवितात तेव्हा खरोखर वाईट वाटते. युरोपीय देशांमध्ये अस्तित्वात असलेला कोल्पॅक करार हाच या सगळ्याचे मूळ आहे, असेही पोलॉकने सांगितले. या करारानुसार कोणत्याही देशाचा खेळाडू युरोपीय देशांमध्ये कोणत्याही संघाकडून खेळू शकतो, त्याला परदेशी खेळाडू समजले जात नाही.

2004 सालापासून हा करार अस्तित्वात आला व त्यामुळे विविध देशांचे अनेक खेळाडू याच्याशी जोडले गेले. दक्षिण आफ्रिकेचा नवोदित वेगवान गोलंदाज डुएल ऑलिव्हर तसेच वरिष्ठ खेळाडू मॉर्ने मॉर्कल यानेही कौंटी क्रिकेट खेळता यावे व भरपूस पैसे मिळावेत यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व हा करार स्वीकारला होता. येत्या दशकात चित्र आणखी भयानक होत जाईल, असेही पोलॉकने व्यक्‍त केले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN