खेलो इंडियासाठी शासनाकडून 7.87 कोटी मंजूर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-30 04:38:00

img

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील विविध ठिकाणी स्थापन केलेल्या 99 खेलो इंडिया अकादमीत प्रशिक्षण घेणाऱया 2625 ऍथलिट्ससाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून 7.87 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. सदर निधी खेलो इंडिया ऍथलिट्ससाठी भत्ता म्हणून दिला जाईल.

भारतामध्ये नव्याने सुरू झालेल्या खेलो इंडिया टॅलेंट विकास योजनेखाली विविध क्रीडा प्रकारांसाठी ऍथलिट्सची प्रशिक्षणाकरता निवड करण्यात आली आहे. देशाचा क्रीडा दर्जा सुधारण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे. चालू वषीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी खेलो इंडिया ऍथलिट्ससाठी 7.87 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक ऍथलिटला मासिक 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे खेलो इंडिया अकादमीतर्फे 5 लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD