गांगुलींचे खेळाडूंना दिवाळी गिफ्ट; मिळणार बक्कळ मानधन

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-29 15:34:17

img

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष होताच त्याने प्रामुख्याने या निर्णयात लक्ष घातले. त्याने प्रथम श्रेणी खेळणाऱ्या युवा खेळाडूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 

गांगुलींने लवकरच प्रथम श्रेणीमधील क्रिकेटपटूंसाठीही कराराची पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंना पगार किंवा फी मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

img

''प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक समस्या असतात. त्यामुळेच खेळाडूंनी जास्त मानधन मिळावे अशी मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्या श्रेणीमध्ये मानधन दिले जाते, त्याच प्रकारची श्रेणी पद्धत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्येही सुरु केली जाणार आहे,'' असे म्हणत त्याने हा निर्णय सांगितला. 

सध्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना वर्षाला 25-30 लाख रुपये मानधन मिळते. आता नव्या निर्णयानुसार खेळाडूंची विभागणी केली जाईल आणि मग त्यांना श्रेणीनुसार मानधन दिले जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआयच्या वतीने A+, A, B, आणि C अशा श्रेणी आहेत. या श्रेणींनुसार खेळाडूंना अनुक्रमे 7 कोटी, 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मानधन दिले जाते.  

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD