गांगुली अध्यक्षपदी आला आता विराटचे कर्णधारपद...

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-15 15:44:01

img

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती झाली आणि साऱ्या भारतीय क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण परसले. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अशातच नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेता कमाल आर खानने गांगुलीला आधी विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हकालण्यास सांगितले आहे. 

''मी बरेच दिवस झाले क्रिकेट पाहायचे सोडून दिले आहे कारण मला फिक्सिंग झालेले सामने पाहायचे नाहीत. माझी आशा आहे की आता गांगुलीसारखा सत्यवादी क्रिकेटपटू बीसीसीआयचा अध्यक्ष झाला आहे म्हणजे तो आधी कोहलीला कर्णधारपदावरुन काढून टाकेल आणि मी पुन्हा क्रिकेट पाहण्यास सुरवात करेन,'' असे ट्विट त्याने केले आहे. 

img

त्याच्या या मागणीवर नेटकऱ्यांनी मात्र त्याची चांगलीच धुलाई केली आहे. 

काल माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची सचिनवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

img

बीसीसीआयची प्रतिमा खालावलेली असताना सौरव गांगुली अध्यक्ष या नात्याने नेतृत्व करणार आहे. काही तरी चांगलं करण्याची ही संधी आहे, असे मत गांगुलीने बीसीसीआयच्या अघ्यक्षपदी बिनविरोध निवड होणार हे निश्‍चित झाल्यावर व्यक्त केले. त्याचबरोबर प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंचे भले करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. 

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रथम श्रेणी क्रिकेपटूंच्या भल्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगून गांगुली म्हणाला, ''प्रशासकीय समिती नियुक्त झाली तेव्हाच मी त्यांची भेट घेऊन प्रथम श्रेणी क्रिकेपटूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सांगितले होते आणि तीन वर्षे त्याचा पाठपुरावा करत होतो,''

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN