गुजरातच्या विजयात पांचाळचे शतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-15 05:11:00

img

वृत्तसंस्था/ जयपूर

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटात सोमवारी येथे झालेल्या सामन्यात सलामीचा फलंदाज प्रियांक पांचाळच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरातने जम्मू-काश्मीरचा 8 गडय़ांनी पराभव केला. गुजरातचा या स्पर्धेतील हा सलग आठवा विजय आहे.

या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून जम्मू-काश्मीरला प्रथम फलंदाजी दिली. जम्मू-काश्मीरने 50 षटकांत 8 बाद 279 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरातने 37.3 षटकांत 2 बाद 282 धावा जमवित हा सामना जिंकला. गुजरातने या सामन्यात 4 गुण मिळविले. जम्मू-काश्मीरच्या डावात अब्दुल समादने 68, शुभम खजुरियाने 66, रसूलने 49 धावा केल्या. गुजराततर्फे कलेरियाने 34 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरातच्या डावात सलामीचा फलंदाज प्रियांक पांचाळने 122 चेंडूत 3 षटकार आणि 17 चोकारांसह नाबाद 135, भार्गव मेराईने 56 चेंडूत 1 षटकार 6 चौकारांसह नाबाद 70, कर्णधार पार्थिव पटेलने 63 धावा जमविल्या. क गटातील आता गुजरात आणि तामिळनाडू यांच्यातील सामना 16 ऑक्टोबरला होणार आहे. या गटात गुजरात आणि तामिळनाडू यांनी आतापर्यंत प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात सेनादलाने बिहारचा 5 गडय़ांनी पराभव केला. सेनादलाला या सामन्यात 4 गुण मिळाले. बिहारने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 बाद 267 धावा जमविल्यानंतर सेनादलाने 48.4 षटकांत 5 बाद 269 धावा जमविल्या.

या स्पर्धेतील बंगाल आणि रेल्वे यांच्यातील सामना टाय झाला. प्रथम फलंदाजी करताना बंगालचा डाव 49.1 षटकांत 223 धावांत आटोपला. त्यानंतर रेल्वेचा डाव 50 षटकांत 223 धावांवर समाप्त झाला. बंगाल आणि रेल्वे या दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुण मिळाले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN