गुणतिलकाचे शतक व्यर्थ; पाकिस्तानचा श्रीलंकेवर विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-04 09:15:51

img

लाहोर: एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज पाकिस्तानने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने ही मालिका 2-0 अशी सहज जिंकली. या मालिकेद्वारे जवळपास दहा वर्षांच्या खंडांनंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने धनुष्का गुणतिलकेच्या दमदार शतकाच्या जोरावर 50 षटकांत 297 धावा केल्या होत्या. गुणतिलकेने दमदार फलंदाजी करताना 134 चेंडूत 133 धावांची आक्रमक शतकी खेळी केली. मात्र, त्याची ही खेळी व्यर्थ ठरविताना पाकिस्तानने सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय आरामात मिळविला.

फकर जमान, अबिद अली आणी हॅरिस सोहेल यांनी तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

74 धावांची खेळी करणारा अबिद अली सामन्याचा मानकरी ठरला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD