गौतमचा 'गंभीर' प्रश्‍न; धोनी मनात येईल तेव्हा खेळतोच कसा ?

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-07-01 09:40:12

img

नवी दिल्ली :  महेंद्रसिंह धोनीने मनाला वाट्टेल तेव्हा खेळू नये. तुम्ही भारतासाठी खेळत असाल तर तुमच्या मनाप्रमाणे मालिकांची निवड करू शकत नाही. त्यामुळे धोनीने प्रत्येक मालिकेत खेळले पाहिजे, असे विधान माजी सलामीवीर गौतम गंभीर याने केले. 

वन-डे क्रिकेटच्या वर्ल्ड कपपासून धोनी खेळलेला नाही. तो केव्ही निवृत्त होणार यावरून समालोचक, तज्ञ आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. वर्ल्ड कपमध्ये संथ फलंदाजीवरून त्याच्यावर टीका झाली. न्यूझीलंडविरुद्ध तो धावचीत झाला आणि मोक्‍याच्या क्षणी हे घडल्यामुळे आणखी टीका झाली. धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेत काश्‍मीरमध्ये आपल्या बटालीयनमध्ये सहभागी होऊन देशसेवा केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो वन-डे मालिकेतही खेळला नाही. त्यापाठोपाठ त्याने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतली. 

या पार्श्वभूमीवर गंभीरने हे विधान केले. तो पुढे म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय त्या खेळाडूचा असतो असेच मी नेहमी सांगत आलो आहे. निवड समितीने धोनीशी चर्चा करायला हवी आणि त्याचा प्लॅन काय आहे हे जाणून घ्यावे. 

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD