ग्रॅमी स्मिथ दुसऱयांदा विवाहबंधनात!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-07 04:32:00

img

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने दुसऱयांदा विवाहबंधनात अडकला आहे. स्मिथ 2 नोव्हेंबर रोजी आपली प्रेयसी रोमी लॅनफ्रांचीशी विवाहबद्ध झाला. 38 वर्षीय स्मिथने सोमवारी लग्नाचा फोटो ट्विट केला आहे. यापूर्वी ऑगस्ट 2011 मध्ये स्मिथने केपटाऊनमध्ये आयरिश गायक मॉर्गन डीनबरोबर विवाह केला होता. या दोघांनाही दोन मुले आहेत. फेब्रुवारी 2015 मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार ठरण्याचा विक्रम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 117 कसोटीत 9265 धावा तसेच 197 वनडे सामन्यात स्मिथने 6989 धावा केल्या आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN