चहापानापर्यंत आफ्रिका 8 बाद 197 धावा

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-12 17:03:00

img

सुकृत मोकाशी / पुणे :

दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 36 वरून खेळायला सुरुवात केल्यावर तिसऱया दिवशी आणखी 5 बळी टिपून आफ्रिकेची चहापानापर्यंत 8 बाद 197 अशी अवस्था करून दुसऱया कसोटीवर आपली पकड मजबूत केली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील मैदानात हा सामना सुरू आहे.

सकाळच्या सत्रात उमेश यादव आणि महंमद शमी यांनी टिच्चून गोलंदाजी केली. दिवसाच्या तिसऱयाच षटकांत मोहमद शमीने अँरीच नॉरखिया (3) याला चौथ्या स्लिपमध्ये विराट कोहलीकरवी झेलबाद करून टीम इंडियाला झकास सुरुवात करून दिली. मगउमेश यादवने थेऊनिस डी ब्रुयनला यष्टीमागे साहाकरवी झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेचे 21 षटकांत 5 बाद 53 अशी दुर्दशा केली. यानंतर सहाव्या विकेटसाठी डुप्लिसी आणि डिकॉक यांनी 75 धावांची भागीदारी करत आफ्रिकेला शतकी टप्पा पार करुन दिला. उपहाराला 15 मिनिट बाकी असताना अश्विनने डिकॉकच्या बेल्स उडवून ही जोडी फोडण्यात यश मिळवले. यानंतर डुप्लिसी आणि मुथुस्वामी यांनी अधिक पडझड न होता आफ्रिकेला उपहारापर्यंत 136 धावापर्यंत पोहोचवले होते.

उपहारानंतर अश्विन आणि जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवत सुरुवातीला मुथुस्वामी आणि नंतर कर्णधार डुप्लिसीला बाद केले. त्यानंतर आलेल्या फिलँडर आणि केशव महाराज यांनी टिच्चून खेळी करत आणखी पडझड होऊ न देता चहापानापर्यंत आफ्रिका 8 बाद 197 धावांपर्यंत पोहचली.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN