छतीसगडचा मुंबईवर 5 गडय़ांनी विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-29 04:43:00

img

वृत्तसंस्था/ अलूर

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे झालेल्या सामन्यात छतीसगडने बलाढय़ मुंबईचा एक चेंडू बाकी ठेवून 5 गडय़ांनी पराभव करत 4 गुण वसूल केले.

या सामन्यात छतीसगडने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने 50 षटकांत 5 बाद 317 धावा जमविल्या. त्यानंतर छतीसगडने 49.5 षटकांत 5 बाद 318 जमवित थरारक विजय नोंदविला.

मुंबईच्या डावात सलामीच्या तरेने 107 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 90, बिस्ताने 42 चेंडूत 2 चौकारांसह 24, जस्वालने 62 चेंडूत 3 चौकारांसह 44, कर्णधार श्रेयस्कर अय्यरने 46 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 50, यादवने 31 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह 81 आणि दुबेने 12 चेंडूत 1 षटकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. तरे आणि जस्वाल यांनी दुसऱया गडय़ासाठी 90 धावांची भागिदारी केली. तरे आणि अय्यर यांनी तिसऱया डय़ासाठी 78 धावांची भर घातली. सुर्यकुमार यादव आणि दुबे यांनी सहाव्या गडय़ासाठी 79 धावांची भागिदारी केल्याने मुंबईला 317 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या डावात 10 ष्घ्टकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. छतीसगडतर्फे प्रताप सिंग आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी 2 तर रूईकरने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना खरेच्या नाबाद शतकाच्या जोरावर छतीसगडने मुंबईचा पराभव केला. खरेने 94 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 117, जीवनज्योत सिंगने 6 चौकारांसह 44, आशुतोष सिंगने 5 चौकारांसह 35,कर्णधार हरप्रित सिंगने 2 चौकारांसह 26, शशांक सिंगने 2 चौकारांसह 40 आणि मंडलने 30 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 39 धावा जमविल्या. छतीसगडच्या डावात 6 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. मुंबईतर्फे मुलानीने 3 तर धवल कुलकर्णी आणि बिस्ता यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक- मुंबई- 50 षटकांत 5 बाद 317 (तरे 90, बिस्ता 24, जस्वाल 44, अय्यर 50, सुर्यकुमार यादव 81, दुबे नाबाद 16 ), छतीसगड- 49.5 षटकांत 5 बाद 318 (खरे नाबाद 117, जीवनज्योत सिंग 44, अशुतोष सिंग 35, हरप्रित सिंग 26, शशांक सिंग 40, मंडल नाबाद 39, मुलानी 3-38).

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD