जखमी राहुल भेके बांगलादेश लढतीतून बाहेर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-03 05:15:00

img

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बचावपटू राहुल भेकेला अनफिट ठरविण्यात आले असून तो 2022 फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या लढतीत सहभागी होऊ शकणार नाही.

15 ऑक्टोबरला कोलकात्यात ही लढत होणार असून या लढतीसाठी प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी 29 संभाव्य खेळाडूंची शिबिरासाठी निवड केली होती. त्यात भेकेचाही समावेश होता. बेंगळूर एफसीचा हा खेळाडू आता दुखापतीमुळे या शिबिरात दाखल होऊ शकणार नाही. तसे ट्विट अभा फुटबॉल फेडरेशनने केले आहे. गेल्या जूनमध्ये त्याने थायलंडमधील किंग्स चषक स्पर्धेत राष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते आणि गट ई मधील विश्वचषक पात्रता फेरीतील ओमान व कतारविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात तो सहभागी झाला होता. गुवाहाटीत झालेल्या सामन्यात भारताला ओमानकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता तर आशियाई चॅम्पियन्स कतारला भारताने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. आता कोलकात्यात बांगलादेशविरुद्धची लढत झाल्यानंतर भारताचे त्यानंतरचे सामने अफगाण व ओमान यांच्याविरुद्ध 14 व  19 नोव्हेंबर रोजी त्यांच्या देशात होणार आहेत.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN