जेव्हा या देशाचे पंतप्रधानच बनतात वॉटर बॉय!

Indian News

Indian News

Author 2019-10-25 13:09:58

img

श्रीलंकेचा संघ(Sri Lanka) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांचा काल(24 ऑक्टोबर) पंतप्रधान एकादश(Prime Ministers XI)विरुद्ध टी20चा सराव सामना पार पडला. या सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली.

कॅनबेरा येथे झालेल्या या सराव सामन्यादरम्यान चक्क ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान(Australia PM Scott Morrison)स्कॉट मॉरिसन संघासाठी मैदानात पाणी घेऊन आले होते.

त्यांच्या या कृतीचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. तसेच ते पंतप्रधान एकादश संघासाठी पाणी घेऊन जातानाचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर त्यांचे कौतुकही होत आहे.

या सामन्यात पंतप्रधान एकादश संघाच्या डॅनिएल फॅलिन्सने जेव्हा श्रीलंकेच्या दसून शनकाला बाद केले, त्यानंतर मॉरिसन संघासाठी मैदानात पाणी घेऊन गेले होते.

या सामन्यात पंतप्रधान एकादश संघाने 1 विकेटने विजय मिळवला. श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 131 धावा केल्या होत्या आणि पंतप्रधान एकादश संघाला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंतप्रधान एकादश संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 19.5 षटकात पूर्ण करत विजय मिळवला.

या सामन्यानंतर श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 ऑक्टोबरला होणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN