जेव्हा विराट कोहली पत्रकारांना करतो ट्रोल, पहा व्हिडिओ

Indian News

Indian News

Author 2019-10-01 22:52:27

img

उद्यापासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी आज(1 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली उपस्थित होता.

या पत्रकारपरिषदेसाठी अनेक पत्रकार उपस्थित असल्याने विराटने पत्रकारांबदद्ल एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच पत्रकारांना पाहून आश्चर्यचकित झालेला विराट गमतीने म्हणाला, 'कोणीही टी20 साठी येत नाही, सगळे त्यावेळी टी20चा आनंद घेत असतात.'

Related Posts

टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू.

Oct 1, 2019

जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार 'या' देशात

Oct 1, 2019

विराटने दिलेल्या या प्रतिक्रियाचा व्हिडिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

उद्यापासून सुरु होणारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ही कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिपचाही भाग असणार आहे.

भारताची ही यावर्षीची मायदेशातील पहिलीच कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरु होणार आहे. हा सामना विशाखापट्टनममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए- वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN