झिम्बाब्वेऐवजी लंकेची बीसीसीआयकडून निवड

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-26 04:47:00

img

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील वर्षी जानेवारीत होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने झिम्बाब्वेऐवजी लंकेची निवड केली आहे.

आयसीसीने झिम्बाब्वेला निलंबित केले असल्याने बीसीसीआयला त्यांच्या जागी दुसरा निवडणे भाग पडले होते. या छोटय़ा दौऱयासाठी त्यांनी लंकेला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. आधी ठरलेल्या नियोजनानुसार, 5 जानेवारी रोजी पहिला टी-20 सामना गुवाहाटीत घेतला जाईल. त्यानंतर इंदोर व पुणे येथे दुसरा व तिसरा सामना 7 व 10 जानेवारी रोजी घेतला जाणार आहे. ‘झिम्बाब्वेवर आयसीसीकडून निलंबनाची कारवाई झाली असल्याने बीसीसीआयने लंकेला या मालिकेत खेळण्याचे निमंत्रण दिले आहे. लंका क्रिकेटनेही त्यात सहभागी होण्यास मान्यता दिली आहे,’ असे बीसीसीआयने सांगितले.

गेल्या जुलैमध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित केल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या भारताच्या मालिकेबाबत साशंकता निर्माण झाली होती. क्रिकेटच्या प्रशासनात तेथील सरकारने हस्तक्षेप केल्यामुळेच आयसीसीने झिम्बाब्वे मंडळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या झिम्बाब्वे मंडळाने कलम 2.4 सी व डी यांचे उल्लंघन केल्याचे आयसीसी मंडळाला आढळून आले होते. या कलमानुसार लोकशाही पद्धतीने आयसीसी सदस्य असलेल्या मंडळाला निवडणूक घ्यावी लागते. पण झिम्बाब्वे सरकारने त्यात हस्तक्षेप करीत ताबा घेतल्याने आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN