टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाॅइट वाॅश’

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-22 15:33:00

img

रांची | वृत्तसंस्था 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यातही भारताने विजयी घोडदौड सुरु ठेवत ‘व्हाॅइट वाॅश’ दिला. भारताने  तिसरा सामना एक डाव आणि तब्बल २०२ धावांनी जिंकत आफ्रिकेला धूळ चारली.

चौथ्या दिवशी ८ बाद १३२ धावांवरून डाव खेळण्यास आफ्रिकेने सुरुवात केली. आज अवघ्या ९ मिनिटांत भारताने डाव गुंडाळला आणि निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केले.

आजच्या विजयाने भारताचा दक्षिण आफ्रिकेवर आजवरचा सर्वात मोठा विजय आहे. तुफान फॉर्मात असलेल्या भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या संघापेक्षा सरस खेळ केला. तिन्ही सामन्यात भारताची ही कामगिरी कायम राहिली. परिणामी आज तिसरा सामना जिंकून भारतानं आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’ दिला.

पहिल्या डावात रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर ४९७ धावांचा डोंगर उभारणाऱ्या भारतानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या १६२ धावांवरच रोखले आणि फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही आफ्रिकी फलंदाज फारशी करामत करू शकले नाहीत. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. आफ्रिकेचा एकही फलंदाज ३० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. क्विंटन डी कॉक अवघ्या पाच धावांवर बाद झाला.

डीन एल्गार जायबंदी झाला. त्यानंतर पाहुण्या संघाचा डाव गडगडला. तिसऱ्या दिवसअखेर त्यांच्या ८ बाद १३२ धावा होत्या. भारताला विजयासाठी फक्त दोन विकेटची गरज होती. भारताचा नवोदित गोलंदाज शाहबाज नदीमनं दुसऱ्याच षटकात आफ्रिकेच्या तळाच्या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कालच्या धावसंख्येत आफ्रिकेला फक्त एका रनची भर घालता आली.

भारताकडून मोहम्मद शमी यानं तीन गडी बाद केले. उमेश यादव व शाहबाज नदीमनं प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत धाडले. तर, जडेजा आणि अश्विननं प्रत्येकी एक बळी घेतला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD