टीम इंडियाचा द. आफ्रिकेला व्हाइटवॉश, मालिका 3-0 ने खिशात

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-22 13:47:00

img

ऑनलाइन टीम / रांची : 

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश दिला आहे. कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारतानं एक डाव आणि तब्बल 202 धावांनी जिंकला आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव 133 धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने मालिका 3-0 ने जिंकली.

आज, मंगळवारी अवघ्या 9 मिनिटांत गुंडाळला आणि निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेवर भारतानं मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा मालिका विजय आहे.

पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. त्यानंतर दुसऱया डावातही आफ्रिकेने खराब कामगिरी केली. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. मोहम्मद शमीने 3, उमेश यादव आणि शाहबाज नदीम 2-2, तर जाडेजा व अश्विनने 1-1 बळी टिपला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD