टीम इंडियाचे टेंशन वाढले, रोहित शर्मा झाला शून्यावर आऊट

Indian News

Indian News

Author 2019-09-28 15:06:45

img

व्हिजियानग्राम येथे दक्षिण आफ्रिका संघाचा बीसीसीआयच्या अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध (Board Presidents XI vs South Africa) 3 दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्याचा आज(28 सप्टेंबर) तिसरा आणि शेवटचा दिवस आहे.

या सामन्यात आज दक्षिण आफ्रिका संघाने 64 षटकात 6 बाद 279 धावांवर त्यांचा पहिला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अध्यक्षीय एकादश संघाची सुरुवात खराब झाली.

अध्यक्षीय एकादश संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा(Rohit Sharma) दोन चेंडू खेळत शून्यावर बाद झाला आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या वर्नोन फिलँडरने बाद केले. त्याचा झेल हेन्रीच क्लासेनने घेतला.

रोहित बाद झाल्यानंतर मयंक अगरवालने अभिमन्यू इश्वरनला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

पण पहिल्या सत्राच्या अखेरीस अभिमन्यू 13 धावा करुन बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने बाद केले.

त्यामुळे पहिल्या डावातील पहिल्या सत्रात अध्यक्षीय एकादश संघाने 2 बाद 23 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्राअखेर मयंक 10 धावांवर नाबाद आहे.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात एडेन मार्करमने 100 धावांची शतकी खेळी केली. तसेच तेंबा बाऊमाने नाबाद 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वर्नोन फिलँडरने 48 धावांची छोटेखानी खेळी केली. या डावात भारताकडून धर्मेंद्रसिंग जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच इशान पोरेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Related Posts

२३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या.

Sep 27, 2019

युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!

Sep 27, 2019

या सराव सामन्यानंतर 2 ऑक्टोबरपासून सुरु भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.

या मालिकेत रोहितची सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. त्याने याआधी कधीही कसोटीत सलामीला फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे त्याची कसोटी सलामीवीर म्हणून कशी कामगिरी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN