टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे हा खेळाडू आऊट

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-09-24 21:17:41

img

मुंबईः टीम इंडियाचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्याच्या टेस्ट सीरिजमधून बाहेर गेला आहे. बीसीसीआयनं ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. आता बुमराहच्या जागी वेगवान बॉलर उमेश यादवाल भारतीय टेस्ट टीममध्ये सहभागी करून घेतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बुमराहच्या पाठीच्या खालच्या बाजूस हलकंस स्ट्रेस फ्रॅक्चर आहे. याचमुळे बुमराह टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. बुमराहवर सध्या मेडिकल उपचार सुरू आहेत. बुमराहनं वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यानं टेस्ट सीरिजच्या दरम्यान सर्वांत वेगानं 50 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. बुमराहनं आतापर्यंत 12 टेस्ट खेळले आहेत, ज्यात 19.24 च्या सरासरीनं 62 विकेट्स घेतल्यात. तर उमेश यादवनं आतापर्यंत 41 सामने खेळले असून 119 विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज 1-1 अशा बरोबरीनं समाप्त झाली होती. सीरिजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर टीम इंडियानं दुसरा सामना 7 विकेट्सनं जिंकला आणि तिसरा सामना 9 विकेट्सनं दक्षिण आफ्रिकेनं जिंकला. आता दोन्ही देशांमध्ये 2 ऑक्टोबरपासून टेस्ट सीरिजची सुरूवात विशाखापट्टणम येथे होणार आहे. दुसरा सामना 10 ऑक्टोबरला पुण्यात आणि तिसरा सामना 19 ऑक्टोबरला रांचीत तिसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

img

बुमराहच्या नावावर नवा रेकॉर्ड

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये बुमराहनं आपल्या पहिल्या 5.5 ओव्हर्समध्ये 10 रन्स देत पाच विकेट्स घेतल्या. तसंच यावेळी बुमराह याने हॅटट्रिक सुद्धा घेतली आणि आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला. यापूर्वी हा कारनामा भारताच्या हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी केला होता. बुमराहने आफल्या 9व्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला माघारी धाडत हॅटट्रिक घेतली.

img

अशी असेल टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे( व्हाइस कॅप्टन), हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), वृद्धमान साहा ( विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, शुभमन गिल.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD