टॉससाठी आले तीन कर्णधार; सामन्यानंतर समोर आले मोठे कारण
सिडनी : सामन्यापूर्वी नाणेफेकीसाठी कधी तीन कर्णधार आल्याचे पाहिले आहे का? मात्र, नुकतेच आस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या महिला ट्वेंटी20 सामन्यात हा प्रसंग घडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने त्याचे कारणही स्पष्ट केले.
अधिकृतरित्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेन लेनिंग आहे. मात्र, नाणेफेकीच्या वेळी लेनिंगसह एलिसा हेलीसुद्धा मैदानावर आली. त्यामुळे नाणेफेकीसाठी मैदानावर श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन कर्णधार लेनिंग आणि हेली या उपस्थित होत्या. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेकही जिंकली.
सामन्यानंतर सांगितले कारण
लेनिंगने सामन्यानंतर दोन कर्णधारांबरोबर उतरण्याच्या निर्णयाचा खुलासा केला. गेल्या अनेक सामन्यांमध्ये लेनिंग नाणेफेकींमध्ये अपयशी ठरत होती. नाणेफेकीचा तिचा रेकॉर्ड अत्यंत खराब होता असेही तिने सांगितले आणि म्हणूनच हेली नाणेफेकीसाठी माझ्यासोबत आली. त्यानंतर आम्ही नाणेफेक जिंकलो सुद्धा.