ट्वेन्टी-२०मध्ये सत्ता कुणाची?

Loksatta

Loksatta

Author 2019-11-10 03:12:01

img

भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका

दिल्लीतील खराब हवामान आणि राजकोटला ‘माहा’ चक्रीवादळाचा इशारा या नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत झालेल्या दोन सामन्यांनंतर भारत-बांगलादेश ट्वेन्टी-२० मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात जामठय़ावर सत्ता कुणाची प्रस्थापित होणार, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या निर्णायक सामन्यात भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरील अखेरची लढत जिंकून मालिकेवर २-१ असे वर्चस्व मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मात्र तमिम इक्बालची दुखापत आणि शाकिब अल हसनचे निलंबन या हादऱ्यांनंतरही बांगलादेशच्या संघाकडे धक्का देण्याची क्षमता नक्कीच आहे.

पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पर्याय चाचपडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात भारताचे ६ बाद १४८ धावांचे आव्हान बांगलादेशने आरामात पेलले. मग दुसऱ्या लढतीत बांगलादेशला ६ बाद १५३ धावांत रोखून भारताने आठ गडी राखून विजय मिळवला. रोहितने दोन्ही सामन्यांत एकच संघ खेळवल्याने मनीष पांडे, संजू सॅमसन व राहुल चहर अद्याप संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

रोहितसाठी खास रणनीती

राजकोटला रोहित शर्माची ८५ धावांची वादळी खेळी चाहत्यांनी अनुभवली. त्याच्यावर कसे नियंत्रण मिळवावे, यासाठी बांगलादेशचा संघ रणनीती आखत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहितने आपल्या फलंदाजीचे गुपित उलगडण्यास नकार दिला. सलामीवीर शिखर धवनने दोन सामन्यांत ७२ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली फलंदाजी करीत आहे. लोकेश राहुल आणि अष्टपैलू शिवम दुबे प्रभाव पाडू शकलेले नाहीत. २ जामठाच्या मैदानावर भारताने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. २०१६च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील न्यूझीलंडविरुद्धचा सामना भारताने गमावला होता. भारताच्या तिन्ही सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.

१ यजुर्वेद्र चहलला (४९ बळी) ट्वेन्टी-२०मधील बळींचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एका बळीची आवश्यकता आहे.

गोलंदाजीची भिस्त चहलवर : भारताच्या अननुभवी गोलंदाजीच्या माऱ्याची प्रमुख मदार लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलवर आहे. मध्यमगती गोलंदाज दीपक चहर आणि फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर यांची त्याला छान साथ लाभत आहे. मात्र वेगवान गोलंदाज खलील अहमद (२ सामन्यांत ८१ धावांत २ बळी)  महागडा ठरत आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू कृणाल पंडय़ा दोन्ही आघाडय़ांवर छाप पाडू शकला नाही.

रोहितकडून पंतची पाठराखण

यष्टिरक्षणाच्या मोक्याच्या जागी झगडणारा आणि चुकीचे फटके खेळून बाद होणारा ऋषभ पंत टीकेच्या लक्ष्यस्थान आहे. राजकोटला लिटन दासला बाद करण्यात अपयशी ठरल्यानंतर टीकेची धार अधिक तीव्र झाली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याची पाठराखण केली आहे. सामन्यासंदर्भातील पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, ‘‘ऋषभ फक्त २२ वर्षांचा आहे, परंतु त्याची वारंवार चर्चा केली जात आहे. त्यामुळे ऋषभच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याला मनासारखे खेळू द्या. त्याने काही चांगल्या खेळीसुद्धा साकारल्या आहेत.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पंडय़ा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, राहुल चहर, यजुर्वेद्र चहल, संजू सॅमसन, खलिल अहमद.

बांगलादेश : मदमुदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN