ठरलं! यादिवशी होणार आयपीएल २०२०चा लिलाव

Indian News

Indian News

Author 2019-10-01 15:18:29

img

पुढीलवर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम असणार आहे. या मोसमासाठी यावर्षी 19 डिसेंबरला कोलकता येथे खेळाडूंचा एक छोटा लिलाव पार पडणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हा लिलाव लहान स्वरुपात पार पडणार आहे. या लिलावाआधी आयपीएलमधील सर्व संघ 14 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंचे ट्रेडींग करु शकतात.

येत्या आयपीएल मोसमासाठी सर्व संघांकडे त्यांच्या संघ उभारणीसाठी 85 कोटी रुपये असणार आहेत. मागील मोसमापेक्षा 13 व्या मोसमासाठी सर्व संघाकडे 3 कोटी रुपये ज्यादाचे असणार आहेत.

मागील वर्षाच्या लिलावानंतंर 2020 आयपीएलच्या लिलावासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक रक्कम आहे.

त्यांच्याकडे या लिलावासाठी 8.2 कोटी रुपये आहेत. त्यांच्यानंतर राजस्थान रॉयल्स असून त्यांच्याकडे 7.15 कोटची रक्कम आहे. त्याचबरोबर कोलकता नाईट रायडर्सकडे 6.05 कोटी, सनरायझर्स हैद्राबादकडे 5.3 कोटी, किंग्स इलेव्हन पंजाबकडे 3.7 कोटी रुपये आहेत.

तसेच चेन्नई सुपर किंग्सकडे 3.2 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 3.05 कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडे 1.8 कोटी रुपये आहेत.

Related Posts

.तर कोहलीची टीम इंडिया भारतात करणार.

Oct 1, 2019

पहा व्हिडिओ: मार्नस लॅब्यूशानेने पँट निसटल्यानंतरही केले.

Sep 30, 2019

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN