डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव

Indian News

Indian News

Author 2019-11-07 10:50:07

img

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे आयपीएलचा (इंडियन प्रीमिअर लीग) प्रत्येक मोसमात खेळाडूंचा लिलाव होतो. यावेळी 2020 मधील स्पर्धेसाठी येत्या डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

आयपीएलच्या या 13 व्या मोसमात काही बदल केले जाणार आहेत. या स्पर्धेत केवळ नो-बॉल पाहण्यासाठी चौथा पंच नियुक्त केला जाणार आहे. तसेच आता या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी या स्पर्धेतील काही सराव सामने तसेच प्रदर्शनीय सामने परदेशातही आयोजित केले जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांनी मंडळाला परदेशात सराव सामने खेळण्याची परवानगी मागितली आहे.

यामुळे या स्पर्धेचा विस्तार जगभरात होईल. त्याचबरोबर खेळाडू मुख्य स्पर्धेआधी सराव सामनेही खेळतील.

उद्‌घाटन सोहळा रद्द
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा प्रचंड खर्चिक उद्‌घाटन सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले आहे. कलाकारांना निमंत्रित करत करोडो रुपयांचा खर्च होतो, त्यामुळे जवळपास 30 कोटी रुपये विनाकारण खर्च होतात. हा खर्च अनावश्‍यक असल्याचे बैठकीत समोर आले. सगळ्याच सदस्यांचे एकमत झाल्याने हा प्रचंड खर्चिक सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD