तामिळनाडूचा केरळवर 37 धावांनी विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-09 04:54:00

img

वृत्तसंस्था/ थिरूवनंतपुरम

सय्यद मुस्ताकअली करंडक टी-20 स्पर्धेतील येथे शुक्रवारी झालेल्या ब गटातील सलामीच्या सामन्यात तामिळनाडूने केरळचा 37 धावांनी पराभव केला. या सामन्यात तामिळनाडूला 4 गुण मिळाले. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात विदर्भने त्रिपुराचा 9 गडय़ांनी पराभव केला.

ब गटातील सलामीच्या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून तामिळनाडूला प्रथम फलंदाजी दिली. तामिळनाडूने 20 षटकात 5 बाद 174 धावा जमविल्या. बाबा अपराजितने  35, मोहम्मदने नाबाद 34, दिनेश कार्तिकने 33 आणि शाहरूख खानने 28 धावा जमविल्या. केरळच्या थंपीने 49 धावात 3 गडी बाद केले. त्यानंतर केरळला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. के. रोहनने 34,  सचिन बेबीने 32 धावा जमविल्या. तामिळनाडूच्या नटराजन आणि पेरीस्वामी यानी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात विदर्भने त्रिपुराचा 9 गडय़ांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराने 20 षटकात 8 बाद 102 धावा जमविल्या. त्यानंतर विदर्भने 12.3  षटकात 1 बाद 103 धावा जमवित विजय मिळविला.  फजलने 54 तर अक्षय कोलारने  नाबाद 45 धावा झळकविल्या. या सामन्यात विदर्भाला 4 गुण मिळविले. अन्य एका सामन्यात राजस्थानने मणिपुरचा 97 धावांनी पराभव करून 4 गुण मिळविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या. मनेंदसिंगने 77 तर लांबाने 49 धावा जमविल्या. त्यानंतर मणिपुरने 20 षटकात 9 बाद 74 धावा केल्या. राजस्थानच्या तन्वीर उल हकने 7 धावात 4 गडी बाद केले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN