तामिळनाडूच्या विजयात मुरली विजयचे शतक

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-05 05:04:00

img

वृत्तसंस्था/ जयपूर

येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गटातील सामन्यात मुरली विजयच्या दमदार शतकाच्या जोरावर तामिळनाडूने जम्मू काश्मीरचा 8 गडय़ानी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील तामिळनाडूचा हा सलग पाचवा विजय आहे. मुरली विजयने या सामन्यात 117 धावांची खेळी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जम्मू काश्मीर संघाने 50 षटकात 9 बाद 238 धावा जमविल्या. कमरान इकबालने 67, शुभम सिंगने 66, अब्दुल समादने 50 धावा जमविल्या. तामिळनाडूतर्फे साई किशोर तसेच टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडूने 48 षटकात 2 बाद 239 धावा जमवित हा सामना 8 गडय़ानी जिंकला. या सामन्यात तामिळनाडूला 4 गुण मिळाले. मुरली विजयने बाबा अपराजित समवेत दुसऱया गडय़ासाठी 166 धावांची भागीदारी केली. मुरली विजयने 117 तर अपराजितने नाबाद 86 धावा झळकविल्या.

या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात सेनादलाने मध्यप्रदेशचा 7 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेशने 50 षटकात 7 बाद 282 धावा जमविल्या. त्यानंतर सेनादलाने 47 षटकात 3 बाद 283 धावा जमवित विजय मिळविताना 4 गुण वसूल केले. अन्य एका सामन्यात त्रिपुराने राजस्थानचा 47 धावांनी पराभव करत 4 गुण मिळविले. या सामन्यात त्रिपुराने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 285 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थानचा डाव 47 षटकात 238 धावात आटोपला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN