तामिळनाडू, छत्तीसगड उपांत्य फेरीत

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-22 04:38:00

img

वृत्तसंस्था/ बेंगळूर

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडू आणि छत्तीसगड या संघांनी  उपांत्य फेरी गाठली आहे तर पावसाच्या अडथळय़ामुळे मुंबईचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे.

तामिळनाडू आणि पंजाब यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पावसाचा अडथळा आला दरम्यान तामिळनाडूने क गटात आपले 9 पैकी सर्व सामने जिंकून अघाडीचे स्थान घेत उपांत्य फेरी गाठली. तर अ गटात छत्तीसगडने 8 पैकी 5 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान केवळ चार सामने जिंकले आहेत. मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. तामिळनाडू आणि गुजरात तसेच यजमान कर्नाटक आणि छत्तीसगड यांच्यातील उपांत्य फेरीचे सामने बुधवारी खेळविले जाणार आहेत.

मुंबई आणि छत्तीसगड यांच्यातील सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने मुंबईला 39 षटकांत विजयासाठी 195 धावांचे नवे उद्दीष्ट देण्यात आले पण 11.3 षटकांत मुंबईने बिनबाद 95 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने हा सामना वाया गेला. नियमानुसार किमान 20 षटकांचा खेळ होणे जरूरीचे होते पण तसे न झाल्याने हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले आणि  त्यामुळे छत्तीसगडने उपांत्य फेरी गाठली.

पंजाब आणि तामिळनाडू यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंजाबने तामिळनाडूला 39 षटकांत 6 बाद 174 धावांवर रोखले असताना पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर पंजाबने 12.2 षटकांत 2 बाद 52 धावा जमविल्या. पुन्हा पावसाचा अडथळा आल्याने हा सामना रद्द करावा लागला.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड 45.4 षटकांत 6 बाद 190, मुंबई 11.3 षटकांत बिनबाद 95, तामिळनाडू 39 षटकांत 6 बाद 174, पंजाब 12.2 षटकांत 2 बाद 52.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD