तेंडुलकर, लारा पुन्हा मैदानात उतरणार

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-16 05:06:00

img

फेब्रुवारीत भारतात होणार वर्ल्ड सिरीज टी-20 स्पर्धा

वृत्तसंस्था/ मुंबई

महान फलंदाज सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा हे दोन माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून पुढील वर्षी भारतात होणाऱया रोड सेफ्टी टी-20 वर्ल्ड सिरीजमध्ये ते खेळणार आहेत. यात अनेक माजी खेळाडू सहभागी होणार आहेत.

वर्ल्ड सिरीज ही प्रतिवर्षी घेण्यात येणारी टी-20 स्पर्धा असून ऑस्ट्रेलिया, द.आफ्रिका, लंका, विंडीज व भारत या पाच देशांतील निवृत्त झालेले क्रिकेटपटू त्यात भाग घेणार आहेत. तेंडुलकर व लारा यांच्याशिवाय वीरेंदर सेहवाग, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान जाँटी ऱहोड्स हे खेळाडूंदेखील त्यात खेळताना दिसणार आहेत. पुढील वर्षी 2 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

46 वर्षीय तेंडुलकरने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्याने कसोटी व वनडेच सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. सर्वाधिक 200 कसोटी खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर असून 100 आंतरराष्ट्रीय शतके नोंदवणारा सध्या तो एकमेव फलंदाज आहे. लाराने 2007 मध्ये निवृत्ती घेतली तेव्हा 11953 कसोटी धावा त्याच्यावर नावावर होत्या. नाबाद 400 धावांचा वैयक्तिक विकमही त्याच्यावर नावावर असून 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अँटिग्वा कसोटीत त्याने हा विक्रम नोंदवला होता.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD