दक्षिण आफ्रिकेची दाणादाण; पुण्यात भारताचा 'विराट' विजय

Indian News

Indian News

Author 2019-10-13 20:06:12

img

पुणे | विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. भारताने एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

सामन्यातील चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेला 189 धावांवर गुंडाळणे शक्य झाले. त्यामुळे भारताने एक डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला.

पहिला डाव भारताने 601/5 धावांवर घोषीत केला. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रीका संघ 275 धावांवर सर्वबाद झाला.

त्यामुळे भारताने 326 धावांची आघाडी घेतली होती.

दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. आफ्रिकेला केवळ 189 धावांची मजल मारता आली. यावेळी उमेश यादवने 3 तर जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 2 गडी बाद केेले.

नरेंद्र मोदी म्हणतात…महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं…

मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका; राज ठाकरेंची जनतेला भावनिक साद

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN