दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारताला निर्भेळ यश

Thodkyaat

Thodkyaat

Author 2019-10-22 07:34:08

img

रांची :  भारताने दक्षिण आफ्रिकेला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत करत आफ्रिका संघााला  व्हाइटवॉश दिला आहे. भारताने एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत 3-0  ने मालिका जिंकली आहे.

भारतीय गोलंदाजांनी अक्षरक्ष: आफ्रिकन फलंदाजांना रडवले. भारताच्या 497 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताने पहिल्या डावात 162 धावांवर रोखले. तर  फॉलो-ऑन दिल्यानंतर आफ्रिकेचा दुसरा डाव 133 धावांवर गुंडाळला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या होत्या. यामध्ये हिट मॅन शर्माने 212 धावांची  द्विशतकी खेळी केली. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही 115 धावांची शतकी खेळी केली. त्यासोबतच रविंद्र जडेजाने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर उमेश यादवने 2 आणि शाहबाज नदीमने आज सकाळच्या सत्रात उरलेले 2 बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

महत्वाच्या बातम्या-



READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD