दर्जेदार फलंदाज शुभमन गिल

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-02 17:15:00

img

सध्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने झाली. टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. आता सर्वांच्या नजरा कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत.

2 ऑक्‍टोबरला पहिली कसोटी आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून यात शुभमन गिल या 20 वर्षीय युवा खेळाडूची निवड झाली आहे. शुभमनचा भारतीय संघात समावेश होईल, असे भाकीत अनेक माजी खेळाडूंनी वर्तवले. इतकेच नाही तर तो भारताचा भविष्यातील सुपरस्टार असेल असेही काही जाणकार म्हणतात. शुभननने लहान वयातच आपल्या दर्जेदार फलंदाजीने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या नावाची खरी चर्चा सुरु झाली ती 2018-19 अंडर 19 वर्ल्ड कपपासून. या स्पर्धेत तो भारतीय संघाचा कर्णधार होता.

आपल्या चाणाक्ष नेतृत्वाने त्याने विजेतेपद मिळवून दिले होते. इतकेच नाही तर आपल्या फलंदाजीने त्याने वर्ल्ड कप गाजवला होता. तो या स्पर्धेत मॅन ऑफ दि सिरीज होता. त्यात त्याने 6 सामन्यातील 5 डावात 112.38 च्या सरासरीने सर्वाधिक 372 धावा काढल्या. त्याने पाकिस्तानविरुद्धचे शतक लक्षवेधी होते. अवघ्या 97 चेंडून 102 धावांची खेळी करत त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपले.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही खोऱ्याने धावा काढल्या. रणजीत पंजाब कडून खेळताना त्याने दर्जेदार शतक झळकवले 2018 -19 च्या रणजी स्पर्धेत पंजाबकडून खेळताना त्याने 5 सामन्यातील 9 डावात 104च्या मजबूत सरासरीने तब्बल 728 धावा काढल्या. यात एक द्विशतकही होते. कोलकाता नाईट रायडर या संघाने 2019 मध्ये त्याला संघात सामील करुन घेण्यासाठी तब्बल 1 कोटी 80 लाख रुपये मोजले. आयपीएलमध्ये कोणत्याही युवा खेळाडूला इतकी रक्कम यापूर्वी मिळाली नव्हती. कोलकाता नाईट रायडर संघाने त्याच्यावर जो विश्‍वास दाखवला तो त्याने सार्थ ठरवला. या आयपीएल स्पर्धेत आपल्या बॅटची कमाल दाखवित त्याने 14 सामन्यात 32.88 च्या सरासरीने 296 धावा काढल्या.

त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन निवड समितीने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारत अ संघात त्याचा समावेश केला. त्याने या संधीचे सोने केले वेस्ट इंडिज सारख्या उसळत्या खेळपट्टीवर व दर्जेदार वेगवान गोलंदाजी समोर त्याने दोन सामन्यात 244 धावा काढल्या विशेष म्हणजे तिथेही त्याने एक द्विशतक झळकवले. याच द्विशतकामुळे वरिष्ठ संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. तो केवळ मर्यादित षटकांसाठीच नाही तर कसोटीसाठीही योग्य आहे यावर शिक्कामोर्तब झाले. कसोटीसाठी लागणारे टेम्परामेन्ट तसेच मोठी खेळी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत फ्रंटफुट प्रमाणेच बॅकफूटवरही तो उत्तम खेळू शकतो आता त्याला कसोटीत संधी मिळाली आहे, या संधीचेही तो सोने करेल यात शंका नाही.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN