दिल्लीचा बडोद्यावर 10 धावांनी विजय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-05 04:45:00

img

वृत्तसंस्था/ वडोदरा

येथे सुरु असलेल्या विजय हजारे चषक वनडे स्पर्धेत बलाढय़ दिल्लीने विजयी घोडदौड कायम ठेवताना बडोद्यावर 10 धावांनी विजय संपादन केला. पावसाचा व्यत्यय आलेला हा सामना प्रत्येकी 38 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा डाव 37.4 षटकांत 148 धावांवर संपुष्टात आला. नितिश राणाने सर्वाधिक 27 तर अनुज रावत 21, मनन शर्माने 18 धावांचे योगदान दिले. बडोद्याकडून कृणाल पंडय़ाने चार बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यानंतर बडोद्याच्या डावात पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने त्यांना विजयासाठी 139 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना बडोदा संघाचा डाव 33.2 षटकांत 128 धावांवर आटोपला. केदार देवधर (20), कृणाल पंडय़ा (20) व विशाल सोळंकी (12) धावा केल्या. पण, दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर बडोद्याच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातल्याने अखेरीस त्यांना 10 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD