दिवस अखेर भारत 3 बाद 273 धावा

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-11 02:28:00

img

पुणे । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी दणकेबाज खेळी केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकणार्‍या मयंक अग्रवालने दुसर्‍या कसोटी सामन्याचा पहिला दिवसही गाजवला. रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणार्‍या मयांकने आज पुन्हा दणदणीत शतक (108 धावा) ठोकले. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे शतक आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्या 75 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 3 विकेट गमावत 273 धावांचा आकडा गाठला. सध्या कोहली 63 तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर खेळत आहेत.

मयंक अग्रवालच्या 108 धावा, चेतेश्वर पुजाराच्या 58 धावा आणि विराट कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारताने आज पहिल्या दिवशी 3 बाद 273 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचे तीन गडी बाद झाले असून दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाने हे तीनही गडी बाद केले. आजच्या सामन्याचा खेळ संपला त्यावेळी कर्णधार विराट कोहली नाबाद 63 धावांवर तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 18 धावांवर खेळत आहेत. मैदानात अंधूक प्रकाश आल्याने पंचाने आजचा खेळ थांबवला.

भारताने टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीने खेळायला सुरुवात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकणार्‍या रोहित शर्माला आजच्या सामन्यात केवळ 14 धावा करता आल्या. रोहितला रबाडाने बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात मयंकने चेतेश्वर पुजारा साथीने संयमी खेळ करत उपहारपर्यंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर पुजारानेही आपले कसोटीतील अर्धशतक पुर्ण करुन संघाचा दीडशेचा टप्पा पार केला. मात्र पुजाराच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. अर्धशतक पुर्ण केल्यानंतर काही वेळातच बाद झाला. या दोन्ही फलंदाजांनी पहिला सत्राचा खेळ संपेपर्यंत मैदानात टिच्चून फलंदाजी करत 138 धावांची भागीदारी केली.

मयंक अग्रवालने आपल्या शतकासह विरेंद्र सेहवागच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सेहवागने 2009 मध्ये सलामीचा फलंदाज म्हणून दक्षिण आफ्रिका विरोधात सलग शतकी खेळी करण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता मयंकनं अशी कामगिरी केली आहे. याआधी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात मयंकने 215 धावांची खेळी केली होती

ब्रेकनंतर मयंक अग्रवाल आणि पुजारा या जोडीने पुन्हा एकदा खेळायला सुरूवात करून दुसर्‍या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपापले अर्धशतक झळकावले. 58 धावांवर खेळत असताना चेतेश्वर पुजाराला रबाडाने बाद केले. या अर्धशतकी खेळीत पुजाराने 9 चौकार आणि 1 षटकार ठोकला. पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात विराट कोहली उतरला. मयंक अग्रवालने 2 षटकार व 16 चौकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. मयंक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी संथगतीने फलंदाजी केली. विराट कोहलीने 105 चेंडूचा सामना करीत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहानेने 70 चेंडूचा सामना करीत नाबाद 18 धावांवर तो खेळत आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN