दिवस-रात्र कसोटीसाठी भारताची अनुकुलता

Indian News

Indian News

Author 2019-10-18 09:30:26

img

कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पूर्वी दिवस-रात्र कसोटी खेळण्यास सातत्याने नकार देणारे मंडळ आता मात्र या प्रस्तावाबाबत अनुकुलता दर्शवत आहे.

ज्या वेळी जागतिक स्तरावर टी-20 सामन्यांच्या क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हा देखील भारतीय मंडळाने यात फार रस घेतला नव्हता. तसेच 2007 सालच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी तर भारतीय संघाने केवळ एकच टी-20 सामना खेळला होता.

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीची मुदत संपत असून नवी समिती स्थापन होणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

त्याचवेळी वेंगसरकर यांच्या मर्जीतील रोहित शर्मा याची टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्‍ती होण्याची दाट शक्‍यता असून कोहलीला या प्रकारच्या सामन्यांसाठी कर्णधारपदावरून बाजूला केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. निवड समितीचे सध्याचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची मुदत संपत असून त्यांच्या जागी वेंगसरकर यांची निवड होणार असे सांगण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीच्या सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. याआधी देखील वेंगसरकर यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. विराट सध्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा क्रिकेटच्या तीनही प्रकारातील संघाचा कर्णधार आहे. रोहितवर वेंगसरकर यांची मर्जी राहिली आहे. वेंगसरकर हेच निवड समितीचे अध्यक्ष असताना 2008 मध्ये कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तरीही कोहलीपेक्षा रोहितकडे टी-20 संघाचे कर्णधारपद जावे अशी शक्‍यता देखील त्यांनी बोलून दाखविली होती. आता प्रत्यक्षात त्यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष राहणार आहे.

त्याबरोबर भारताने डीआरएसलाही विरोध केला. आता डे-नाईट कसोटीसाठीही नकार व्यक्त केला होता, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय मंडळाची प्रतिमा अत्यंत नकारात्मक झाली होती, त्यात बदल करण्यासाठी मंडळाचे भावी अध्यक्ष सौरव गांगुली याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

गांगुली 23 ऑक्‍टोबरला मंडळाची सूत्रे हातात घेणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत दिवस-रात्र कसोटी सामन्याचा पर्याय असेल, तर भारत मागे राहणार नाही असेही मंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वेस्ट इंडिजमध्ये डे-नाईट कसोटी खेळायला तयार झाले होते, पण नंतर त्यांनी प्रशासकीय समितीला पत्र लिहिले होते. भारतीय संघ तयार नाही गुलाबी चेंडूने खेळण्यासाठी भारतीय संघाला किमान दीड महिन्यांचा कालावधी आवश्‍यक आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN