दुसऱया टी-20 लढतीवर वादळाचे सावट

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-06 04:40:00

img

राजकोट / वृत्तसंस्था

दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यावर धुक्याचे व प्रदूषणाचे सावट राहिल्यानंतर आता राजकोट येथे होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यावर वादळाचे सावट असणार आहे. महा नावाचे हे वादळ गुजरात किनाऱयावर गुरुवारी घोंघावणे अपेक्षित असून याच दिवशी सायंकाळी 7 वाजता सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर भारत-बांगलादेश यांच्यात ही लढत आयोजित केली गेली आहे.

सध्याच्या घडीला महा नावाचे हे वादळ पोरबंदरहून 660 किलोमीटर्स अंतरावर असून गुजरातमधील बहुतांशी जिल्हय़ात यामुळे दि. 6 व 7 नोव्हेंबर रोजी संततधार होणे अपेक्षित आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे हवामानाच्या अंदाजावर बारीक लक्ष आहे. सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. पण, आता सर्व भिस्त हवामानावर आहे. गुरुवारी सकाळी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पण, सामना सायंकाळच्या सत्रात होणार आहे, असे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱयाने नमूद केले.

यापूर्वी दिल्लीतील पहिली टी-20 बांगलादेशने जिंकून 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. राजकोट येथील दुसऱया लढतीनंतर नागपूरमध्ये दि. 10 नोव्हेंबर रोजी उभय संघातील तिसरी व शेवटची लढत होणार आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD