दुसऱ्या टी२० सामन्यावर चक्रीवादळाचे सावट

Indian News

Indian News

Author 2019-11-06 07:46:24

img

राजकोट : दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे प्रभावित पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गुरुवारी येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीवर चक्रीवादळाचे सावट आहे. चक्रीवादळ 'महा' गुरुवारी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या भाकीतानुसार 'महा' पोरबंदर व दीव दरम्यान गुरुवारी पहाटे वादळच्या रुपाने गुजरातच्या किनाऱ्यावर दाखल होईल.

शहराच्या बाहेरच्या भागात असलेल्या सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममध्ये सायंकाळी ७ वाजता सामना प्रारंभ होणार आहे.

सध्याच्या स्थितीनुसार 'महा' अरबी समुद्रातील 'अत्यंत गंभीर चक्रीवादळ' असून पोरबंदरपासून जवळजवळ ६६० किलोमीटर दूर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुजरात किनाऱ्यावर दाखल होण्यापूर्वी कमकुवत होईल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळामुळे राजकोटसह गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ६ व ७ नोव्हेंबरला हलका ते साधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेची (एमसीए) हवामान खात्याच्या अंदाजावर नजर आहे. एससीएचे सिनिअर अधिकारी म्हणाले,'आम्ही सामन्याचे यजमानपद भूषविण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत, पण त्याचसोबत हवामानावरही नजर आहे. ७ तारखेला सकाळी पावसाची शक्यता आहे, पण सामना सायंकाळी आहे. मंगळवारी सकाळी शहरात स्वच्छ सूर्यप्रकाश होता. दोन्ही संघ सोमवारी येथे दाखल झाले आहेत. दिल्लीतील वायू प्रदूषणानंतरही पहिला टी२० आंतरारष्ट्रीय सामना खेळला गेला. त्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी
उभय संघांचे आभार मानले. बांगलादेशने भारताचा ७ गडी राखून पराभव करीत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD