दुसऱ्या टी-20 लढतीवरही वादळी पावसाचे सावट

Indian News

Indian News

Author 2019-11-05 07:40:00

img

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे खालावलेला हवेचा दर्जा सर्वांसाठी चिंतेचा मुद्दा ठरला आहे. त्यामुळेच पहिल्या टी-20 सामन्याचे ठिकाण बदलण्याची मागणी सतत करण्यात येत होती. बीसीसीआयने सामन्याचे ठिकाण बदलण्यास नकार दिल्यानंतर ही लढत वेळापत्रकानुसार पार पडली. यानंतर दुसऱ्या टी-20 लढतीवरही वादळी पावसाचे काळे ढग तयार झाले आहेत. निसर्ग काही हिंदुस्थान आणि बांगलादेश संघांतील क्रिकेट मालिकेची पाठ सोडायला तयार नाहीय .

गुरुवारी 7 नोव्हेंबरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ राजकोटच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध दोन हात करणार आहे . मात्र याच कालावधीत अरबी समुद्रात ' महा ' नावाचे चक्रीवादळ येणार असल्यामुळे लढतीच्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे . दिव - दमण , वेरावल परिसरात या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू असल्यामुळे या काळात गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . हिंदुस्थानी हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली .

… तर दुसऱ्या टी -20 वर पावसाचे पाणी

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD