दुसऱ्या डावात अश्विन चमकला, भारताची विजयाकडे वाटचाल

Indian News

Indian News

Author 2019-10-13 15:31:11

img

दक्षिण आफ्रिकेचा संघ सहाशे धावांच्या डोंगरापुढे कोलमडून पडला. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे दक्षिण आफ्रिका सध्या पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. पुणे येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आला. परंतु, कमी प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणार की दुसऱ्या डावात थोडा काळ फलंदाजी करणार याबद्दल क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता होती. परंतु, कोहलीने गोलंदाजांना रात्रीची विश्रांती मिळाल्यामुळे आफ्रिकेच्या संघाला फॉलोऑन देणेच पसंत केले. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी खरा ठरवला.

दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद केले. जलदगती गोलंदाज इशांत शर्माने मार्करामला तर शून्यावरच तंबूत पाठवले. दुसरा सलामीवीर डीन एल्गरने ४८ धावा फटकावून एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला आर. अश्विनने बाद केले. त्यानंतर आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार फाफ ड्युप्लेसीदेखील अवघ्या पाच धावा काढून अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकला रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले.

Web Title - India is on verge of victory against south africa in second test match

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN