देवधर करंडक स्पर्धेसाठी विहारी, पटेल, गिलकडे नेतृत्व

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-26 04:57:00

img

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पुढील आठवडय़ापासून सुरु होणाऱया देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत अ, ब व क संघाची शुक्रवारी बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली. भारत अ, ब व क संघाचे नेतृत्व अनुक्रमे हनुमा विहारी, पार्थिव पटेल आणि शुभमन गिल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दि. 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान रांची येथे स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.

भारत अ संघ – हनुमा विहारी (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, अभिमन्यू ईश्वरन, विष्णु विनोद, अमनदीप खरे, अभिषेक रमन, इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविचंद्रन आश्विन, जयदेव उनादकट, संदीप वॉरियर, सिद्धार्थ कौल, भार्गव मेराई.

भारत ब संघ – पार्थिव पटेल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), प्रियांक पांचाळ, यशस्वी जैस्वाल, बाबा अपराजित, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, शाहबाज नदीम, अनुकूल रॉय, कृष्णप्पा गौथम, विजय शंकर, मोहम्मद सिराज, रुश कलारिया, पृथ्वीराज, नितीश राणा.

भारत क संघ – शुभमन गिल (कर्णधार), मयांक अगरवाल, अनमोलप्रीत सिंह, सूर्यकुमार यादव, प्रियम गर्ग, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, मयांक मार्कंडये, जलज सक्सेना, आवेश खान, धवल कुलकर्णी, इशान पोरेल, डी. जी. पठानिया, विराट सिंह.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD