देवधर ट्रॉफी : भारत क संघ अंतिम फेरीत

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-11-03 05:05:00

img

भारत ब संघावर 136 धावांनी मात, अक्षर पटेल, विराट सिंगची आक्रमक अर्धशतकी खेळी

वृत्तसंस्था/ रांची

अष्टपैलू अक्षर पटेल (61 चेंडूत नाबाद 98), विराट सिंग (76) व दिनेश कार्तिक (34) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर देवधर चषक स्पर्धेत भारत क संघाने भारत ब वर 136 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रारंभी, भारत क संघाने 5 बाद 280 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत ब संघाचा डाव 144 धावांत आटोपला. आता, सोमवारी रांची उभय संघ जेतेपदासाठी आमनेसामने येतील.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना भारत क संघाला सलामीला दोन धक्के बसले. कर्णधार शुभमान गिल (1) व अनमोलप्रीत सिंग (23) झटपट बाद झाले. तसेच प्रियम गर्ग (18) व सुर्यकुमार यादव (10) हे स्टार फलंदाजही बाद झाल्याने भारत क संघ 4 बाद 70 अशा अडचणीत सापडला होता. विराट सिंग व दिनेश कार्तिक जोडीने पाचव्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, कार्तिकला 34 धावांवर नितीश राणाने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने चौफेर फटकेबाजी 61 चेंडूत 13 चौकार व 3 षटकारासह नाबाद 98 धावा केल्या. त्याला विराट सिंगने 96 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारासह नाबाद 76 धावा करत चांगली साथ दिली. अक्षर व विराटच्या या खेळीमुळे भारत क संघाने 50 षटकांत 5 बाद 280 धावा जमवल्या.

प्रत्युतरातदाखल खेळताना मयंक मार्कंडेय (25 धावांत 4) व ईश्वर पोरेल, जलज सक्सेना (प्रत्येकी 2 बळी) यांच्या भेदक गोलंदजीसमोर भारत ब संघाचा डाव 43.4 षटकांत 144 धावांवर आटोपला. बाबा अपराजितने सर्वाधिक 53 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल (28) व ऋतुराज गायकवाड (20) हे स्टार फलंदाज वगळता इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने भारत ब संघाला 136 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक : भारत क 50 षटकांत 5 बाद 280 (विराट सिंग नाबाद 76, दिनेश कार्तिक 34, अक्षर पटेल नाबाद 98, अनमोलप्रीत सिंग 23, शादाब नदीम 2/37, विजय शंकर 1/18).

भारत ब संघ सर्वबाद 144 (बाबा अपराजित 53, यशस्वी जयस्वाल 28, गायकवाड 20, मार्कंडेय 4/25, पोरेल 2/33). 

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD