देश बदल रहा है!

Indian News

Indian News

Author 2019-10-23 08:32:43

img

दक्षिण अफ्रिकेला व्हाईटवॉश दिला. टीम इंडियाचा 'विराट विजय' एवढेच या विजयाचे महत्व नाही तर संघभावना दाखवत केलेला खेळ दाखवून देत होता, देश बदल रहा है

एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेविरूध्दला व्हाईट वॉश दिला. टीम विराटने ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली. या विजयाने भारताने कसोटीतही जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. कप्तान म्हणून विराटचा मायदेशातील खेळपट्ट्यांवरहा 11वा मालिका विजय आहे. पाहुण्या संघाला एकही संधी न देता पूर्ण मालिका जिंकण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.

कसोटीत पदार्पण करणाऱ्या शहबाझ नदीमने (6 षटकांत2/18) दिवसाच्या दुसऱ्या षटकात दक्षिण अफ्रिकेचा डाव गुंडाळला.

दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिका सर्वबाद 133 पर्यंत मजल मारू शकला. पल्यिा डावातील 162 धावांची मजल मारण्यास त्यांना 29 धावा कमीच पडल्या.

या मालिकेत 529 धावा फटकावत रोहित शर्माने मायदेशाच्या वातावरणात सलामीवीर म्हणून नव्या भूमिकेत स्व:त:चा ठसा उमटवला. मयंक अग्रवालनेही एक द्विशतक आणि एक शतक झळकावत गेले काही वर्ष भेडसावणारा सलामीचा प्रश्‍न मिटवला.

दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराच्या अनुपस्थितही गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. फिरकी गोलंदाजांएवढीच मध्यमगती गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करण्याचे दुर्मिळ चित्र या मालिकेत पहायला मिळाले.

जर रविंद्र जडेजा (13 बळी) आणि रविचंद्रन अश्‍विन (15 बळी) यांनी 28 बळी मिळवले तर महंमद शामी(3 सामन्यात 13 बळी), उमेश यादव( दोन सामन्यात 11 बळी) इशांत शर्मा यांनी (2 सामन्यात2) 26 फलंदाज टिपले. आम्ही आमची जबाबदारी पूर्ण करण्यास नेहमीच तयार असतो. कप्तान म्हणून विराट आम्हाल विश्‍वास देतो. जे हवे ते करण्याचे स्वातंत्र्य देतो. आम्ही उजव्या भागात आणि योग्य टप्प्यावर मारा केला. तंदुस्ती खूप महत्वाची असते. त्यासाठी संपूर्ण संघातच त्याकडे लक्ष देण्याचे वातावरण आहे. आम्ही एकमेकांचे यश आनंदाने साजरे करण्याएवडे एकरूप झालो आहोत. त्यामुळे आमचा आत्मविस्वास वाढतो, असे शामीने पत्रकारांना सांगितले.

भारतीय संघाच्या मधयमगती माऱ्यापुढे यंदा दक्षिण अफ्रिकेचा संघ हतबल झाल्याचे चित्र या मालिकेत एकदा पहायला मिळाले. नव्या चेंडूवर गोलंदाजांनी झंझावाती कामगिरी केली.
दक्षिण अफ्रिकेची पलंदाजी दोन शतके आणि चार अर्धशतके झळावू शकली. उसळत्या खेळपट्ट्यांवर खडेळण्या आम्हाला सर्व बाजूने अपयश आले. अश कबुली त्यांचा कप्तान प्लेसीसने दिली. यजमानांनी जिद्दीने खेळ केला. सर्वच बाबतीत आमच्या पेक्षा सरस होते, फिरकी गोलंदाजी, जलदगती गोलंदाजी फलंदाजी अगदी क्षेत्ररत्रणातही ते सरस होते ही कबुलीच देश बदल रहा है ची साक्ष होता.

-श्‍वेता शिगवण

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD