दे दणादण! 'त्या' चार षटकांत चोपल्या विश्वविक्रमी धावा

Indian News

Indian News

Author 2019-10-28 17:03:58

img

मुंबई : चार षटकांमध्ये जास्तीत जास्त किती धावा काढल्या जातील, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता का? तुम्हाला सांगितले की, विजयासाठी 4 षटकांमध्ये 75 धावांची गरज आहे तर... या समीकरणात गोलंदाजी करणाऱ्या संघाचे पारडे जड असेल. पण एका सामन्यात चार सामन्यांमध्ये चक्क 75 धावा चोपल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये एक ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात आला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना होता. हा सामना आपल्या वाढदिवशी गाजवला तो ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने. पण या सामन्यात एक नकोसा विक्रमही पाहायला मिळाला.

या सामन्यात श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाज कसुन रजिताला चांगलेच चोपल्याचे पाहायला मिळाले. कारण आतापर्यंतच्या ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा नकोसा विश्वविक्रम टर्कीच्या तुनाहान तुरानच्या नावावर होता. त्याने झेक प्रजासत्ताकविरुद्धच्या सामन्यात चार षटकांत 70 धावा दिल्या होत्या. पण या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रजिताने 75 धावा दिल्या आहेत. त्यामुळे आता हा नकोसा विक्रम रजिताच्या नावावर जमा झाला आहे.

डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला टी२० सामन्यात १३४ धावांनी पराभूत केले. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावत जोरदार पुनरागमन केले. आपल्या वाढदिवशीच नाबाद १०० धावा करत वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला निर्धारित २० षटकांत २३३ धावांचा टप्पा गाठून दिला. वॉर्नरने कर्णधार अ‍ॅरॉन फिंच व ग्लेन मॅक्सवेल बरोबर शतकी भागीदारी केली.

धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकात ९ बाद ९९ धावा इतकीच मजल मारु शकला. अ‍ॅडम झम्पाने १४ धावा देत तीन बळी घेतले. अ‍ॅशेस मालिकेत खराब कामगिरी केलेल्या वॉर्नरने फक्त ५६ चेंडूत चार षटकार व दहा चौकारांच्या साह्याने आपले शतक पूर्ण केले. अ‍ॅशेस मालिकेत दहा डावात वॉर्नरने फक्त ९५ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय फिंच व मॅक्सवेल यांनीही अर्धशतक झळकावली. यावेळी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ याच्यावरही सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. श्रीलंकेच्या कासुन रंजिता याने चार षटकांत ७५ धावा दिल्या. टी२० मधील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कमिन्से दोन बळी मिळवले. श्रीलंकेकडून दासुन शनाका याने सर्वाधिक १७ धावा केल्या.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD