द्रविडची आज ‘बीसीसीआय’च्या नीती अधिकाऱ्यांपुढे साक्ष

Loksatta

Loksatta

Author 2019-09-26 05:42:17

img

मुंबई : हितसंबंधांच्या आरोपांसंदर्भात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांच्यापुढे साक्ष देणार आहे.

४६ वर्षीय द्रविड सध्या बंगळूरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. याचप्रमाणे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मालकीच्या इंडियन सिमेंट्स ग्रुप कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी सांभाळण्याआधीपासूनच द्रविड भारत ‘अ’ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडबाबत हितसंबंधाची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, ‘बीसीसीआय’चे कर्मचारी मयांक पारिख यांनासुद्धा गुरुवारी नीती अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पारिख मुंबई क्रिकेट संघटनेच्या अखत्यारीतील काही क्लबचे सदस्य असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आहे.

‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार कोणतीही व्यक्ती एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. गुरुवारी दोघांच्या साक्षीनंतर निती अधिकारी निर्णय देतील.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN