द्विशतकवीर मयांकची रोहितसह 317 धावांची सलामी!

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-04 03:25:00

img

वृत्तसंस्था /विशाखापट्टणम :

मायभूमीत पहिलीच कसोटी खेळणाऱया मयांक अगरवालने शानदार द्विशतक व रोहित शर्माने तडफदार दीडशतक झळकावल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 7 बाद 502 धावांचा डोंगर रचला. शिवाय, दिवसअखेर आफ्रिकन संघाची 3 बाद 39 अशी दाणादाण उडवली. मयांकने येथे 371 चेंडूत 215 तर रोहितने 244 चेंडूत 176  धावांचे योगदान दिले. या जोडीने 317 धावांची त्रिशतकी सलामीही दिली.

भारताने 7 बाद 502 धावांचा डोंगर रचल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे एडन मॅरक्रम (5), थेऊनिस डे ब्रुएन (4) व नाईट वॉचमन डेन पिएडेट (0) अतिशय स्वस्तात बाद झाले. या कसोटी सामन्यात ते अद्याप 463 धावांनी पिछाडीवर आहेत.

रविचंद्रन अश्विनने मॅरक्रम व ब्रुएन यांचा बचाव भेदत आफ्रिकन डावाला खिंडार पाडले तर रविंद्र जडेजा पिएडेटला त्रिफळाचीत करण्यात यशस्वी ठरला. अश्विनने क्लासिकल ऑफब्रेक चेंडूवर मॅरक्रमचा त्रिफळा उडवला तर नंतर ब्रुएनला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले.

दिवसभराच्या खेळात मयांकचा बोलबाला

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी रोहितनंतर येथे दुसऱया दिवसाच्या खेळात मयांक अगरवालचा खऱया अर्थाने बोलबाला राहिला. फलंदाजीला पोषक वातावरणाचा पुरेपूर लाभ घेत मयांकने जोरदार फटकेबाजी केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे आघाडीचा जलद गोलंदाज व्हरनॉन फिलँडरचा अपवाद वगळता अन्य सर्व गोलंदाजांनी अतिशय सुमार गोलंदाजी केली, ते ही भारताच्या पथ्यावरच पडले. त्यांच्या तीनही स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजांना चांगलाच मार सोसावा लागला, हे देखील भारताच्या पहिल्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले.

सेहवाग-द्रविडचा विक्रम मोडला

रोहितने 115 तर अगरवालने 84 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर उपाहारापूर्वीच आपली सलामी 317 धावांच्या उच्चांकापर्यंत नेली. या जोडीने सेहवाग व राहुल द्रविड यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही क्रमांकासाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा भारतीय विक्रमही मोडीत काढला. रोहित यष्टीचीत होत बाद झाल्यानंतर मयांकने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि आक्रमक फलंदाजीवर भर दिला. बेंगळूरस्थित मयांकसाठी भारतातील ही पहिलीच कसोटी ठरली. यापूर्वी त्याने 4 कसोटी सामने ऑस्ट्रेलिया व विंडीज भूमीत खेळले होते. अगरवालची झुंजार द्विशतकी खेळी अखेर डीन एल्गारने संपुष्टात आणली. डीप मिडविकेटवरील पिएडेटने हवेत झेपावत अप्रतिम झेल टिपला. चहापानावेळी भारताने 5 बाद 450 धावांपर्यंत मजल मारली. या सत्रात संघाने 4 गडी गमावत 126 धावांची भर घातली.

तत्पूर्वी, पिढलँडरने उपाहारानंतर पहिल्कााऍा ऍाsंडूवर पुजाराला (6) बाद वढरत काजमान संघाला धवमवढा दिला. पिढलँडरऍकाा विंढऍााrत वळलेल्काा ऍाsंडून ऑपढस्टम्प उदध्वस्त वेढला. 20 धावांऍकाा छोटय़ा खेळीदरम्काान विराटऍाs पढटवेढ उबाम बसत होते. पण, पदार्पणवीर सेनूरन मुथूसामीला परतीऍाा झेल देत त्कााने तंबूऍाा रस्ता धरला. त्काापूर्वी रोहित डावातील 23 व्काा षटवढात बाद झाला होता. उपाहारापकाआत भारताने 88 षटवढात 1 बाद 324 धावा वेढल्काा. काा सत्रात संघाने 4.28 ऍकाा सरासरीने 122 धावांऍााr आतषबाजी वेढली. रोहितला काादरम्काान 125 धावांवर काष्टीरक्षवढ डी वढाŸवढने जीवदान दिले. पिढलँडर काsथे वढमनशिबी ठरला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN