द्विशतकवीर रोहित : रहाणेचे शतक

Indian News

Indian News

Author 2019-10-20 21:31:14

आफ्रिकन गोलंदाजांचे कंबरडे मोडले

रांची : दक्षिण आफ्रिकेवरिूद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रविवारी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्याने २५५ चेंडूंमध्ये २१२ धावांची खेळी साकारली.

यात सहा षटकार आणि २८ चौकारांचा समावेश आहे. रोहितसह उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही शतकी खेळी साकारल्याने भारताने या कसोटीत ४९७ धावांचा डोंगर उभारला.

रोहित शर्माने २५५ चेंडूंत २१२ धावा केल्या . त्यात सहा षटकार आणि २८ चौकार आहेत. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. रांचीत दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी त्यानं द्विशतक पूर्ण केले. हे त्याचे पहिलेच द्विशतक आहे. तिसर्‍यांदा त्याने १५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी १७७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

तत्पूर्वी , भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात अडखळत झाली होती. अवघ्या ३९ धावांवर संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले होते. मात्र, रोहित शर्मानं अजिंक्य रहाणेच्या साथीने जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं ८६ चेंडूंतच अर्धशतक साजरे केले. तर शतक पूर्ण करण्यासाठी त्यानं १३० चेंडूंचा सामना केला. त्याने पहिल्या दिवशीच शतक पूर्ण केले होते.

तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळं काही वेळ थांबवण्यात आला होता . त्यावेळी रोहित शर्मा ११७ धावांवर, तर रहाणे ८३ धावांवर खेळत होता. या दोघांनीही दुसर्‍या दिवशीही डावाची सुरुवात केली. दुसर्‍या दिवशीही त्यांनी मैदानावर वर्चस्व गाजवले. रोहित शर्मानं द्विशतक साजरे केले तर अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी केली. भारताने ४९७ धावांचा डोंगर उभारला असून प्रतिस्पर्ध्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजांचे यामुळे अवसान गळाल्याचे चित्र पहायला मिळाले. दिवसअखेर ९ धावांवर आफ्रिकेचे दोन फलंदाज माघारी परतले आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD