द.आफ्रिका मालिकेतून बुमराह बाहेर

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-09-25 05:35:00

img

स्ट्रेस प्रॅक्चरमुळे किमान दोन महिने दूर राहणार, उमेश यादवला त्याच्या जागी संधी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधीच भारताला धक्का बसला असून आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह पाठीच्या खालच्या भारताच्या स्ट्रेस प्रॅक्चर झाल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच पुढींल महिन्यात बांगलादेविरुद्ध होणाऱया मालिकेतही तो सहभागी होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

द.आफ्रिकेविरुद्ध होणाऱया तीन कसोटींच्या मालिकेसाठी त्याच्या जागी उमेश यादवची निवड करण्यात आली असून 2 ऑक्टोबरपासून या मालिकेतील पहिली कसोटी विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे. ‘रेडिओलॉजिकल स्क्रीनिंगवेळी बुमराहची दुखापत स्पष्टपणे आढळून आली. त्याला आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे दुखापत पुनर्वसन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवणार आहे. वरिष्ठ निवड समितीने त्याच्या जागी उमेश यादवची निवड केली आहे,’ असे बीसीसीआयने निवेदनाद्वारे सांगितले.

एक पदाधिकारी मात्र म्हणाला की, बांगलादेशविरुद्ध मायदेशात होणारी मालिकाही त्याला हुकणार आहे. त्या मालिकेत 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने व 2 कसोटी होणार आहेत. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचाच ही मालिका एक भाग असेल. ही मालिका 2 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ‘स्टेच प्रॅक्चरमुळे जसप्रितला सात ते आठ आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागेल. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कसोटी मालिकेतही तो खेळू शकणार नाही, हे स्पष्टच आहे. तो नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत खेळू शकणार नाही, असे त्याच्या मेडिकल बुलेटिनवरून स्पष्ट झाले आहे,’ असे या अधिकाऱयाने सांगितले. ‘समाधानाची बाब अशी की, प्राथमिक स्थितीतच त्याची दुखापत उघड झाली असल्याने ती बरी होण्यास दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. अन्यथ स्ट्रेस प्रॅक्चर बरे होण्यास बराच कालावधी लागतो,’ असेही या अधिकाऱयाने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. काहीशी विचित्र गोलंदाजी शैली असलेला बुमराह अचूक दिशा व टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. विशेषतः भेदक यॉर्कर्स टाकण्यात त्याचा हातखंडा असून प्रतिस्पर्धी फलंदाजांत त्याची बरीच दहशत निर्माण झाली आहे. विंडीजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तो विंडीजचा कर्दनकाळ ठरला होता. त्याने दोन कसोटीतच 13 बळी मिळविले होते. 25 वर्षीय बुमराह कसोटीमध्ये भारतातर्फे सर्वात जलद वेळेत बळींचे अर्धशतक पूर्ण करणारा गोलंदाज हाण्याचा मानही त्याने या मालिकेवेळी मिळविला. विंडीजविरुद्धच्या दुसऱया कसोटीवेळी त्याने हा बहुमान प्राप्त केला. त्याने हा टप्पा केवळ 11 कसोटीत गाठताना वेंकटेश प्रसाद व मोहम्मद शमीचा 13 सामन्यांत हा टप्पा गाठण्याचा विक्रम मागे टाकला.

त्याच्या जागी स्थान मिळालेल्या डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱयात शेवटचा सामना खेळला होता. 31 वर्षीय यादव गेल्या महिन्यात विंडीज दौऱयावर गेलेल्या भारत अ संघाचा सदस्यही होता. पण त्या मालिकेत त्याला विशेष प्रभाव पाडता आला नाही. आतापर्यंतच्या 41 कसोटीत त्याने 33.47 धावांच्या सरासरीने 119 बळी मिळविले आहेत. विशाखापट्टणममधील पहिल्या सामन्यानंतर उर्वरित दोन कसोटी पुणे (10 ते 14 ऑक्टोबर) व रांची (19 ते 23 ऑक्टोबर) येथे खेळविल्या जाणार आहेत.

भारताचा सुधारित कसोटी संघ : कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN