धक्का! एसटी कर्मचाऱ्यांची होणार वेतनकपात

Indian News

Indian News

Author 2019-11-08 20:39:31

img

खरेदी करताय? तत्पूर्वी खालील 'Search Box' मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!

खरेदी करताय? तत्पूर्वी वरील 'Search Box' मध्ये आपल्या पसंतीचे ब्रँड लिहा (उदा.Amazon, Flipkart, Firstcry ई.) आणि कुपन कोड मिळवून ८०% पर्यंत बचत करा!

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी ऐन दिवाळीत निदर्शने केल्याचा ठपका ठेवत मुंबईसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटिशीवर आठ दिवसांत उत्तर न दिल्यास दिवाळी भेट आणि एका दिवसाचा पगार अशी एकूण रक्कम पगारातून कापण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. यामुळे एसटी महामंडळ आणि संघटनेच्या वादात सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना वेतनकपात सहन करावी लागण्याची दाट शक्यता आहे.

न्यायालय, शिक्षण, पोलीस, बेकायदा सावकारी ई.बाबत कायदेतज्ञांकडून जाणून घ्या तुमचे शेकडो कायदेशीर अधिकार, सर्व लेख एकत्रित वाचण्यासाठी क्लिक करा!

दिवाळीसाठी १२,५०० रुपये उचल देण्याच्या मागणीसह, खराब गाड्या, नादुरुस्त तिकीट मशीन अशा एकूण २० मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत निदर्शने केली.एसटीच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. दिवाळी भेट देऊन ही निदर्शने करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महामंडळाने दिलेल्या नोटिशीमध्ये, '१९९५ ते १९९९ या काळात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रथमच २५०० रुपये भेट देण्याची सुरुवात केली.१९९९ ते २०१४ या काळात कर्मचाऱ्यांना भेट मिळाली नाही. २०१५ ते २०१८ या काळात कुणीही मागणी केली नसताना ही भेट दिली', असे स्पष्ट करण्यात आले. महामंडळाने दिवाळी भेट देऊनही २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या निदर्शनात आपण सहभाग घेतला. दिवाळीपूर्वी रक्कम दिल्यानंतरही आंदोलन केले. यामुळे दिवाळी भेट आणि एक दिवसाचे वेतन का कापू नये याचा खुलासा करावा. आठ दिवसांत खुलासा न केल्यास दिवाळी भेटीची व एक दिवसाच्या वेतनाची रक्कम पगारातून एकरकमी वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे ही महामंडळाने विभाग नियंत्रकाच्या मार्फत दिलेल्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकारी नॉट रिचेबल कारणे दाखवा नोटीसबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल आणि महामंडळाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक नॉट रिचेबल होता. विभाग नियंत्रकांनी दिलेल्या नोटीसमध्ये कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. २०पेक्षा अधिक मागण्यांसाठी जेवणाच्या सुट्टीत घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत महामंडळाला आगाऊ पत्र दिले होते. पत्रानंतर २३ ऑक्टोबर रोजी चर्चेची बैठक महामंडळाने आयोजित केली. ऐनवेळी बैठक रद्द झाली. निदर्शनादरम्यान एसटी कामात अडथळा झालेला नाही. वेतनकपात केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. - हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवर नजर (रुपयांमध्ये) एसटी महामंडळ (कर्मचारी) - २५०० एसटी महामंडळ (अधिकारी) - ५००० मुंबई महापालिका - १५००० बेस्ट - ९१००

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN