धक्कादायक! BCCIने पैसेच दिले नाहीत, भारतीय संघ अडकला परदेशात

Indian News

Indian News

Author 2019-10-31 15:36:00

img

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. बीसीसीआय ही आर्थिक दृष्ट्या सर्वात यशस्वी बोर्ड आहे, त्यामुळं आयसीसीचे सर्व निर्णय त्यांच्यावर अवलंबून असतात. एवढेच नाही तर बीसीसीआय इतर देशांच्या क्रिकेट बोर्डला मदत करते. दरम्यान सर्वात श्रीमंत बोर्डाला आपल्याच देशातील क्रिकेट संघा आंतरराष्ट्रीय़ दौऱ्यासाठी पैसे देत नाही, असे ऐकले तरी नवल वाटेल. मात्र नुकताच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जात असताना बीसीसीआयच्या वतीनं खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापनाला तेथील खर्चासाठी एक ठराविक रक्कम देण्यात येते.

मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पैसे न दिल्यामुळं संपूर्ण संघ विदेशी भुमीवर अडकून पडला आहे. हा प्रकार घडला भारतीय महिला संघासोबत. भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर महिला संघ 3 एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र विदेशी दौऱ्यावर गेलेल्या मिताली राज आणि कंपनीला दैनिक भत्ता मिळू शकलेला नाही आहे. याचे कारण म्हणजे बीसीसीआयची नवी प्रशासिक समिती.

बीसीसीआयचे प्रमुख अधिकारी यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, "जुन्या प्रशासकिय समितीच्या कार्यकालामध्ये या दौऱ्यासाठी वित्तीय प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 18 सप्टेंबरला या प्रक्रियेसाठी सुरूवात झाली, 24 ऑक्टोबरला पुन्हा एकदा मेल करण्यात आला तर देखील विदेशी भुमीवर भारताचा महिला संघ पैशांअभावी अडकला असेल, तर त्याला जबाबदार कोण? सगळे काय बीसीसीआयच्या नव्या प्रशासकिय समितीची वाट पाहत होते का?", असे सवाल केले.

दरम्यान ही गोष्टी बीसीसीआयच्या प्रशासकिय समिताल कळताच मिताली राज आणि कंपनीला भत्त देण्यात आला. 30 ऑक्टोबरला Cricket Operations and women's cricket in-chargeच्या मॅनेजर सबा करिम यांनी बीसीसीआयच्या नव्या प्रशासकिय समितीची संपर्क करून ही प्रक्रिया सुरू केली. दरम्यान बीसीसीआयच्या अंतर्गत गोंधळामुळे महिला क्रिकेट संघाला त्रास सहन करावा लागला.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकिय समितीला फैलावर घेत हे प्रकरण गंभीर असल्याचे इंडिया टुडे या वृत्तसंस्थेला सांगितले. या पदाधिकाऱ्यांनी, "जर सबा करिम यांनी मेल केला होता, तर त्यावर लक्ष का दिले नाही. 23 सप्टेंबरला मेल केल्यानंतर 25ला पुन्हा माहिती देण्यात आली. त्यानंतर तब्बल 1 महिन्यांच्या कालावधीनंतर 30 ऑक्टोबरला हा भत्ता खेळाडूंना देण्यात आला. ही कोणती पध्दत आहे?", अशा शब्दात बीसीसीआयवर टीका करण्यात आली.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना हा 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. यासाठी 4 दिवसआधी वेस्ट इंडिजमध्ये पोहचलेल्या भारतीय महिला संघाला 2 दिवस पैशाविना काढावे लागले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD