धोनीचं अनोखं पदलालित्य पाहून त्याचे चाहते झाले खुश

Indian News

Indian News

Author 2019-10-08 22:31:49

img

भारताचा सर्वाधिक चर्चेत असलेला क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून लांबच आहे. मात्र मुंबईतल्या एका फुटबॉल सामन्यात तो खेळताना दिसला. त्याच्यासह टेनिसपटू लिएंडर पेसही या सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्यामार्फत जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, तो उपक्रम कोणता आणि कोणत्या धर्मदाय संस्थेने हा सामना आयोजित केला होता, त्याबद्दलची नेमकी माहिती अजूनपर्यंत उघड झालेली नाही.

(हेही वाचा- ट्विटरवर पुन्हा भिडले युवराज सिंग - केविन पीटरसन)

धोनी आणि पेसने जी जर्सी घातली होती, तिच्यावर 'प्लेइंग फॉर ह्यूमॅनिटी' इतकाच संदेश लिहिला होता.

धोनीचे हे फोटो त्याचा जनसंपर्क बघणाऱ्या कंपनीने प्रदर्शित केले आहेत.

(हेही वाचा - रोहित शर्माचा षटकार आणि शतकांचा विक्रम)

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी-२० दौरा आणि वेस्टइंडीज विरुद्धच्या दौऱ्यातही तो गैरहजर होता. त्याचप्रमाणे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यांतही तो गैरहजर असणार आहे. मात्र, डिसेंबरअखेरीस भारतात वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या सामन्यांत तो खेळणार असल्याची चर्चा आहे. इतके असूनही धोनी त्याच्या समाजमाध्यमांवरच्या पोस्ट आणि लष्करातील सेवेमुळे चाहत्यांच्या सतत चर्चेत राहतो आहे.

Web title - Mahendra Singh Dhoni's fans cherished his football skills

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD