धोनीचा विचार सोडून द्या अन् पुढचा विचार करा”

Thodkyaat

Thodkyaat

Author 2019-09-20 07:00:36

img

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत वक्तव्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे. संघाने आता त्यांना विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून पुढचा विचार करायला हवा. आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावसकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला आहे.

आपल्याला आता पुढील विचार करायला हवा. धोनी आता संघात बसत नाही. माझ्या संघात तरी तो बसत नाही, असं सुनिल गावसकर यांनी म्हटलं आहे.

तुम्ही टी-20 विश्वचषकाबाबत बोलत आहात, तर मी रिषभ पंतचा विचार करेन. मी संजू सॅमसनबाबत विचार करेन, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुनील गावसकर यांनी थेट धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केल्याने पुन्हा एकदा धोनीच्या विवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या- 



READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD