धोनीच्या मैदानावर अखेरची लढत

Deshdoot

Deshdoot

Author 2019-10-18 01:31:00

img

रांची। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवार (दि.19) रोजी होणार्‍या तिसर्‍या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ आफ्रिकेला क्लिन स्विप देण्याच्या इराद्याने उतरणार आहे. काल भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ रांचीत पोहोचला आहे.

रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदानावर अखेरची लढत होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना होत आहे. भारतीय संघाकडून मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे रांचीत कालच दाखल झाले आहे तर कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडू आज दाखल झाले. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला विशाखापट्टणम आणि पुणे येथे दोन कसोटी सामन्यांमध्ये मात देत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

तिसर्‍या आणि अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. येथील मैदानावर पहिला कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मार्च 2017 मध्ये खेळला गेला होता. तो देखील मालिकेतील अखेरचा सामना होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 451 धावा केल्या होत्या तर भारताकडून चेतेश्वर पुजारा 202 आणि रिद्धिमान साहा 117 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 9 बाद 603 धावांवर डाव घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 6 बाद 204 धावा करून सामना बरोबरीत केला होता. या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला सामना आहे. त्यांनी या मैदानावर एकदिवसीय किंवा टी-20 सामना खेळलेला नाही.

सलामीवीर एडनला दुखापत
भारताविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसत आहे. आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्क्रम उजव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे अखेरची कसोटी खेळू शकणार नाही. 19 ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानात अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणम कसोटीपाठोपाठ पुणे कसोटीतही भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान मार्क्रमला दुखापत झाली होती.

यानंतर सिटीस्कॅन केल्यानंतर मार्क्रमच्या उजव्या मनगटालाच्या हाडाला दुखापत झाल्याचे दिसून आले. ज्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात मार्क्रम खेळू शकणार नाही. पुढील उपचारांसाठी मार्क्रम मायदेशी परतणार आहे, त्यामुळे तिसर्‍या कसोटीसाठी कोणत्या खेळाडूला अंतिम संघात जागा मिळते आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN